एका संशयिताला अटक, सीआयडी पोलिसांनी केली कारवाई
प्रतिनिधी/ पणजी
गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी (सीआयडी) गिरी येथे केलेल्या कारवाईत 2 लाख 20 हजार ऊपये किंमतीचा ड्रग्ज जप्त केला आहे. या प्रकरणी एका संशयिताला अटक केली असून संशयिताच्या विरोधात एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा नोंद केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या संशयिताचे नाव पप्पूराम उर्फ प्रकाश (30 जोधपूर राजस्थान) असे आहे. संशयित ड्रग्ज विक्री करण्यासाठी एका विशेष ठिकाणी येत असल्याची माहिती सीआयडी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली आणि संशयिताला रंगेहाथ अटक केली. संशयिताकडून 15.10 ग्रॅम एमडीएमए व 7.70 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.
सीआयडीचे नितीन हाळर्णकर यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने कर्मचारी हवालदार इर्शाद वाटंगी, कॉन्स्टेबल मबलेश्वर सावंत, सायमुल्ला मकानदार, सनील धुरी, सुदेश मतकर, सोनी फर्नांडिस यांनी ही कारवाई केली आहे.









