नवी दिल्ली
प्राप्तीकर विभागाने चालू आर्थिक वर्षामध्ये आत्तापर्यंत 2.14 कोटी करदात्यांना 1.86 लाख कोटी रुपये इतका परतावा दिला असल्याचे समजते. प्राप्तीकर विभागाने या संदर्भातली माहिती नुकतीच दिली आहे. व्यक्तिगत प्राप्तीकर भरण्याच्या 2कोटी 11 लाख 76 हजार 025 प्रकरणांमध्ये 76 हजार 442 कोटी रुपयांचा परतावा दिला गेला आहे. 2 लाख 31 हजार 654 प्रकरणांमध्ये 1 लाख 19 हजार 235 कोटी रुपयांचा कार्पोरेट कर परतावा दिला गेला आहे.
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने 1 एप्रिल 2021 पासून ते 7 मार्च 2022 पर्यंत 2 कोटी 14 लाख करदात्यांना 1 लाख 86 हजार 677 कोटी रुपयांचा परतावा दिला आहे.









