कमी व्हेंटिलेशन असलेल्या ठिकाणी केवळ डिस्टन्सिंग पुरेसे नाही
कोरोना विषाणूपासून वाचण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग अत्यंत आवश्यक आहे. परंतु किती अंतर विषाणूपासून वाचण्यासाठी आवश्यक आहे हे अचूकपणे कुणीच आता सांगू शकत नाहीत. यावरून वैज्ञानिकांमध्येच मतमतांतरे दिसून येत आहेत. आता तज्ञ सोशल डिस्टन्सिंगसाठी नवे सूत्र देत आहेत. 2 मीटरचे अंतर 1 मीटरपेक्षा 10 पट अधिक सुरक्षित असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याचबरोबर छोटय़ा तसेच कमी व्हेंटिलेशन असलेल्या ठिकाणी केवळ सोशल डिस्टन्सिंगच पुरेसे नाही.
आरोग्य यंत्रणांची भूमिका
जागतिक आरोग्य संघटनेकडून स्थापन एका आयोगाने कोरोनाच्या फैलावात फिजिकल डिस्टन्सिंगवरून अध्ययन केले आहे. यात 1 मीटरपेक्षा कमी शारीरिक अंतरात संक्रमणाचा धोका 12.8 टक्के आहे, तर एक मीटरपर्यंत 2.6 टक्के असल्याचे दिसून आले.
ब्रिटनच्या सायंटिफिक ऍडव्हायजरी ग्रूपच्या एका अध्ययनानुसार 2 मीटर अंतराच्या तुलनेत 1 मीटरच्या अंतरावर संक्रमणाचा धोका 2 ते 10 पट अधिक राहतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या आयोगाने जुन्या अध्ययनातील माहितीच स्वतःचे निष्कर्ष म्हणून जगासमोर मांडल्याची टीका तज्ञांनी केली आहे. जवळपास हेच नियम सार्स आणि मर्स विषाणूदरम्यान वापरण्यात आले होते.
केवळ डिस्टन्सिंग पुरेसे नाही