जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची माहिती
बेळगाव : इलकल येथील चित्तर्गी श्री विजय महांतेश्वर संस्थान मठाचे म.नि.प्र. डॉ. महांत शिवयोगी यांचा जन्मदिवस दि. 1 ऑगस्ट रोजी असून तो व्यसनमुक्ती दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यासाठी आवश्यक तयारी करावी, असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. व्यसनमुक्ती दिन साजरा करण्यासाठी अधिकाऱ्यांनी तयारी करावी, शाळा-महाविद्यालयात जनजागृती करण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले. यावेळी निवासी जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी, अतिरिक्त पोलीसप्रमुख आर. बी. बसर्गी, वार्ता खात्याचे उपसंचालक गुऊनाथ कडबूर, समाज कल्याण खात्याचे सहसंचालक नवीन शिंत्रे, कन्नड व संस्कृती खात्याच्या उपसंचालक विद्यावती बजंत्री यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.









