सुधाकर काशीद,कोल्हापूर
एक जून हा जसा वाढदिवसाचा ठखासठ दिवस. तसा 31 मे हा शासकीय निम शासकीय कर्मच्रायांच्या निवृत्तीचा खास दिवस. त्यामुळे कालचा दिवस कोल्हापूर जिह्यातील साधारण 220 कर्मच्रायांच्या नि रोप सोहळ्याने मावळला.अणि आज एक जुनचा दिवस वाढदिवसाच्या क्षणाने उगवला. ज्यांच्या जन्मतारखेचा नेमका पुरावा नाही त्यांची जन्मतारीख एक जून मानन्याचा अलिखित प्रघात आहे. आज जन्म तारखेच्या नोंदी बद्दल लोक जागरूक आहेत. पण 60-70 वर्षांपूर्वी इतकी जागरूकता नसल्याने अनेकांच्या नावापुढे एक जून ही जन्मतारीख आयुष्याच्या वाटचालीची साथीदार ठरली आहे.
ज्यांच्याकडे जन्मतारखेचा दाखला किंवा अन्य पुरावा नाही त्यांच्या शाळेतील दाखल्यावरील जन्मतारीख ग्राह्य मा नली जाते. आणि शाळेत नाव घालताना जन्म तारखेचा दाखला सोबत नसला तर गुरुजींनी प्रवेश दाखल्यावर एक जून ही जन्मतारीख लिहायची एक पद्धतच आहे आणि तसेच झाले आहे. 60 70 वर्षांपूर्वीच्या अनेक जन्म दाखल्यावर एक जून ही जन्मतारीख आहे आणि तीच वाढदिवसाची तारीख ठरली आहे. ही तारीख जन्माची नक्की तारीख नाही हे देखील सर्वांना माहिती आहे .पण तरीही या तारखेला त्यांच्या आयुष्यात मानाचे स्थान आहे.
शिक्षण नोकरीत एक जून याच तारखेवर अनेकांची वाटचाल होत राहिली.त्यामुळे नोकरी लागलेल्या एक जून या तारखेच्या अगोदर 31 मेला निवृत्त होण्याची तारीखही निश्चित झाली. त्यामुळे काल कोल्हापूर जिह्यातील साधारण 220 जणांनी निवृत्ती स्वीकारली.त्यात वन विभाग अठरा,कोल्हापूर महापालिका 37, इचलकरंजी महापालिका सात, इरिगेशन 20, पोलीस 22 ,न्यायालय 18 ,पीडब्ल्यूडी सहा, पोस्ट दहा व इतर विभागातील प्रत्येकी सात आठ जण असे साधारण 220 जण निवृत्त झाले.त्यांच्या कार्यालयात निरोप समारंभ संपन्न झाले.काही ठिकाणी डोळ्याच्या कडा ओलावणारी मनोगते व्यक्त झाली.नोकरीच्या निमित्ताने आपसात झालेल्या वादाला,गैरसमजाला परस्परांनी गळा भेट देऊन कायमची छुट्टी देण्यात आली.शुभेच्छांची देवाण-घेवाण झाली. या 220 जणांच्या आयुष्यात सेवानिवृत्तीनंतरच्या नव्या आयुष्याची पहाट उजाडली. त्यांनी रेंगाळलेल्या मनाची काल ऑफिसची पायरी उतरली. या साऱ्या वातावरणात एक जून या आजच्या तारखेचे महत्त्व आणखी गडद झाले.कारण आज व्हाट्सअप फेसबुक वर अनेकांचे वाढदिवस झळकू लागले.सर्वांचेच नव्हे ,पण बहुतेकांची जन्मतारीख एक जून खरी नसली तरीही या तारखेशी जोडल्या गेलेल्या जन्मदिवसाचे गोडवे आज अधिकच गोड झाले.
घटका गेली पळे गेली…
31 मे म्हणजे आम्ही शासकीय निम शासकीय कर्मचारी या दिवसाकडे निवृत्ती दिन म्हणूनच पाहतो. कारण आमच्यातले अनेक सहकारी आजपर्यंत याच तारखेला निवृत्त झाले. त्यामुळे त्यांना माझा संदेश असा की
घटका गेली पळे गेली, अखेर आली निवृत्ती
थोडे आता निवांत व्हा, बदला आपली ती वृत्ती….
ऑफिसला ना घाई आता, रोज रोजची सुट्टी.
करा निवांत पूजा करा मनाची तृष्ठी…
सावकाश पणे करा भोजन, मारा आडवा हात…
पुरणपोळी कधी बिर्याणी वा कधी साखर भात…
अनिल लवेकर,सचिव राज्य सरकारी कर्मचारी संघटना.