19th anniversary of Atal Pratishthan on Sunday
अटल प्रतिष्ठानचे अटल गौरव पुरस्कार जाहीर
अटल प्रतिष्ठानचा १९ वा वर्धापनदिन रविवार दिनांक ८ जानेवारी रोजी सायंकाळी ठिक ४.०० वाजता राजवाडा सावंतवाडी येथे संपन्न होणार असून यावेळी अटल प्रतिष्ठानच्या राष्ट्रसाधना या स्मरणिकेचे प्रकाशन होणार आहे. महाराष्ट्रात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दहा महानुभावांना अटल गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून यावेळी मानव संसाधन विकास संस्थेच्या अध्यक्षा मा. सौ. उमा सुरेश प्रभू, डिपार्टमेंट आॅफ अॅटोमिक एनर्जी भारत सरकारच्या सयुक्त सचिव मा. सौ. सुषमा तायशेटे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि स्नेहालय अहमदनगरचे संस्थापक अध्यक्ष मा. डॉ. गिरीश कुलकर्णी, सावंतवाडी संस्थानच्या राणी सरकार मा. सौ. शुभदादेवी भोसले, युवराज लखमराजे,युवराज्ञी श्रद्धाराजे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी सर्वानी या सोहळ्यास उपस्थित राहून अटल प्रतिष्ठानच्या समाजाभिमुख उपक्रमास सहकार्य करावे असे आवाहन अटल प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड नकुल पार्सेकर व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
सावंतवाडी / प्रतिनिधी









