अर्थसंकल्पात हरित ऊर्जेची निर्मिती अन् वापर वाढविण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. अर्थमंत्री सीतारामन यांनी राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशनसाठी 19,700 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे. या मोहिमेच्या अंतर्गत अर्थव्यवस्थेला कमी कार्बन उत्सर्जन आणि हरित अर्थव्यवस्थेत बदलण्याची सुविधा प्राप्त करता येणार आहे. राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन अर्थव्यवस्थेला जीवाश्म इंधनाच्या आयातीवरील निर्भरता कमी करण्याची सुविधा प्रदान करणार आहे. यंदाच्या बजेटमध्ये हायड्रोजन मिशनचे लक्ष्य 2030 पर्यंत 5 एमएमटीच्या वार्षिक उत्पादनापर्यंत पोहोचविण्याचे बाळगण्यात आल्याचे नमूद आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाकडून ऊर्जा ट्रान्झिशन आणि शुद्ध शून्य उद्देश तसेच ऊर्जा सुरक्षेसाठी 35,000 कोटी रुपयांच्या प्राथमिकतायुक्त भांडवल गुंतवणुकीसाठी अर्थसंकल्पीय तरतूद प्रदान करण्यात आली आहे. भारत 2070 पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाच्या दिशेने वाटचाल करत आहे. याकरता हरित औद्योगिक आणि आर्थिक संक्रमणाची सुरुवात केली जाणार आहे.
Previous Articleशिक्षक भरती ते डिजिटल प्रणाली
Next Article ‘महिला-बाल विकास’साठी 25,172 कोटींची तरतूद
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









