बाळे–पाकणी स्थानकादरम्यान हृदयद्रावक घटना; कुटुंबीयांच्या डोळ्यांसमोरच घडला अपघात
सोलापूर :
सोलापूर–कुर्डुवाडी रेल्वेमार्गावर बुधवारी (दि. ३० जुलै) सकाळी एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना घडली. 11302 बंगळूर–मुंबई उद्यान एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या अश्विनी लक्ष्मण साळुंखे (वय १९, रा. आळंद, जिल्हा गुलबर्गा, कर्नाटक) या तरुणीचा गाडीच्या दरवाज्यातून तोल जाऊन खाली पडल्यामुळे मृत्यू झाला.
ही दुर्घटना बाळे आणि पाकणी स्थानकादरम्यान घडली. विशेष म्हणजे, हा अपघात अश्विनीच्या कुटुंबीयांच्या डोळ्यांसमोरच घडल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अश्विनी आपल्या कुटुंबासोबत प्रवास करत होती. दरम्यान, रेल्वे दरवाजाजवळ उभी असताना तोल जाऊन ती खाली पडली आणि जागीच तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.








