अहमदाबादेत मुलांचा सामना मुंबईशी तर नागपूरात मुलींचा सामना दिल्लीशी
क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
मुलांच्या 19 वर्षांखालील विनू मांकड चषक आणि मुलींच्या 19 वर्षांखालील एकदिवशीय क्रिकेट स्पर्धेतील लढतींना आज 28 सप्टेंबरपासून सुरूवात होता आहे. आज गोव्याचा मुलांचा संघ आपली सलामीची लढत मुंबईविरूद्ध खेळणार आहे. गोव्याच्या कप्तानपदी अनुभवी फलंदाज कौशल हट्टंगडीची निवड गोवा क्रिकेट संघटनेने केली असून अहमदाबाद येथे या स्पर्धेचे आयोजन होणार आहे.
गोव्याचा स्पर्धेतील एलीट क गटात समावेश असून यात मुंबई, हैदराबाद, टीम राजस्थान, त्रिपुरा, आसाम आणि गोव्याचा समावेश आहे. गोव्याचा दुसरा लीग सामना 29 रोजी आसाम, हैदराबादशी 1 ऑक्टोबर, 2 रोजी त्रिपुराशी तर 4 ऑक्टोबर रोजी टीम राजस्थानशी लढत होईल.
गोव्याचा 19 वर्षांखालील क्रिकेट संघ याप्रमाणेः कौशल हट्टंगडी (कप्तान), आयुष वेर्लेकर, शिवेंद्र भुजबळ, दीप कासवणकर, लकमेश पावणे, फरदीन खान, आर्यन नार्वेकर (विकेटकीपर), प्रज्ञेश गावकर, मनीष पै काकोडे, सनथ नेवगी, सूजय नाईक, इझान शेख, उदीत यादव, शुभम गजीनकर, रंजन सरोज, युवराज सिंग भिके, फैझान सय्यद, साईनाथ पेडणेकर, रिजूल पाठक व नामदेव राऊळ. राजेश कामत (प्रशिक्षक).
19 वर्षांखालील मुलींच्या एकदिवशीय क्रिकेट स्पर्धा आजपासून नागपूरात होणार आहे. गोव्याच्या कप्तानपदी इब्तिझम शेख हिची निवड गोवा क्रिकेट संघटनेने केली असून गोव्याचा स्पर्धेतील पहिला लीग सामना दिल्लीविरूद्ध होईल. गोव्याचा स्पर्धेतील एलीट ब गटात समावेश असून यात दिल्ली, बंगाल, पुडिचेरी, झारखंड, तामिळनाडू आणि गोव्याचा समावेश आहे. गोव्याचा दुसरा सामना 29 रोजी बंगाल, झारखंडशी 1 ऑक्टोबर, 2 रोजी पुडिचेरी तर 4 ऑक्टोबर रोजी तामिळनाडूशी लढत होईल.
गोव्याचा 19 वर्षांखालील क्रिकेट संघ याप्रमाणेः कौशल हट्टंगडी (कप्तान), आयुष वेर्लेकर, शिवेंद्र भुजबळ, दीप कासवणकर, लकमेश पावणे, फरदीन खान, आर्यन नार्वेकर (विकेटकीपर), प्रज्ञेश गावकर, मनीष पै काकोडे, सनथ नेवगी, सूजय नाईक, इझान शेख, उदीत यादव, शुभम गजीनकर, रंजन सरोज, युवराज सिंग भिके, फैझान सय्यद, साईनाथ पेडणेकर, रिजूल पाठक व नामदेव राऊळ. राजेश कामत (प्रशिक्षक).
गोव्याचा 19 वर्षांखालील मुलींचा क्रिकेट संघ याप्रमाणेः इब्तिझम शेख, मेताली गवंडर, पलक आरोंदेकर, प्रेशा नाईक, रिया ढोबळे, रिया नाईक, रोशनी परब मयेकर, सावली कोळंबकर, सेजल नाईक, सेजल शेट्टी, शिवानी नाईक, तनया नाईक, तानिया पवार, उर्वशी गोवेकर, अनालीझ गोम्स, मृण्मयी, शिखा चोडणकर, शेरॉन झेवियर, अस्मी पालव, सिद्धी सवासे. अनंत तांबवेकर (प्रशिक्षक).