नवी दिल्ली
टेक महिंद्राचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सी. पी. गुरनानी यांच्या आर्थिक वर्ष 2022 च्या वेतनामध्ये 189 टक्के वाढ करण्यात आली असल्याची माहिती टेक महिंद्राने आपल्या वार्षिक अहवालातून प्रसिद्ध केली आहे. त्यांचे वेतन आता वरील वाढीनंतर 63.4 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. टेक महिंद्रा ही जागतिक स्तरावरची पाचव्या नंबरची आयटी निर्यातदार कंपनी मानली जाते.









