मानवी मेंदू करत होते फस्त
मानवी इतिहासात असे अनेक समुदाय राहिले आहेत, जे माणसालाच मारून खात होते. म्हणजेच ते नरमांस भक्षण करत होते. आजही जगातील काही अत्यं जुन्या समुदायांचा ज्यांचा आधुनिक मानवाशी कधीच संपर्क झाला नाही ते नरमांस भक्षण करत असल्याचे मानले जाते. इतिहासात अशी उदाहरणे अत्यंत कमी आहेत. परंतु नव्या संशोधनात आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या टीमने 18 हजार वर्षांपूर्वी मॅग्डालेनियन युगात मानव समुदाय नरभक्षण करत होते याचे पुरावे प्राप्त केले आहेत. मानवी मेंदू देखील ते खात होते असे आढळून आले आहे.
संशोधनात त्या काळातील शवागार अन् अनुष्ठन प्रथांची महत्त्वाची माहिती मिळाली आहे. उत्तर पुरापाषाण युरोपच्या काळात मानव शिकारी होता आणि अन्न जमा करत होता. परंतु ते मृत्युमुखी कसे पडत होते याचा नीटप्रकारे शोध लागलेला नाही. मॅग्डालेनियन अंतिम संस्कार कृती अन् प्रथा कशाप्रकारच्या हात्या याचा अनुमान लावता येईल असे काही पुरावे मात्र सापडले आहेत.
मृतदेहांवरून गायब हाडं अनेक प्रकारच्या शक्यता व्यक्त करत होत्या, परंतु स्पष्ट काही होत नव्हते. शरीराच्या काही हिस्से खास कारणामुळे वेगळे केले जात होते असे वाटत होते. मॅग्डालेनियन मानवी हाडांचा वापर दागिने, कवट्यांना कपाप्रमाणे वापरत होत. परंतु खासप्रकारच्या खुणांमुळे संशोधकांसमोरील गुंता वाढला होता.
हाडांवर चावल्याच्या खुणा हाडांच्या सफाईमुळे निर्माण झाल्या का मांसाचे भक्षण करण्याच्या प्रयत्नात झाल्या याबद्दल चर्चा होत राहिली. संशोधकांच्या एका टीमने पोलंडमध्ये माजीचा गुहेत असलेल्या मानवी हाडांच्या विश्लेषणांना असे संकेत शोधून काढले आहेत, जे नरभक्षणाकडे इशारा करत होते. पूर्वीच्या दाव्यात दातांच्या खुणा नसल्याने नरभक्षण असू शकत नसल्याचे नमूद होते. तर नव्या अध्ययनात आकडेवारीचे पुन्हा अध्ययन करत नवे पुरावे जोडण्यात आले. त्या काळात लोक मानवी मेंदू देखील खात होते तसच खास पोषक हिस्स्यांना खाण्याचा प्रयत्न असायचा असेही यात आढळून आले.
त्या काळात लोकसंख्या वाढणे आणि त्यात विस्तार झाल्याने भोजनासाठी प्रतिस्पर्धा असायची. यामुळे संघर्ष वाढला अणि अखेर युद्ध नरभक्षणाच्या परंपरा सुरु झाल्या. लोक स्वकीयांचे मृतदेह खात होते किंवा शत्रूच्या मृतदेहांना खात होते s असा निष्कर्ष सायंटिफिक रिपोर्ट्समध्ये प्रकाशित अध्ययनात संशोधकांनी काढला आहे.









