मुंबई:
विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी देशातील शेअरबाजारामध्ये अठरा हजार पाचशे कोटी रुपयांची गुंतवणूक केली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. अलीकडेच जेपी मॉर्गन यांच्या निर्देशांकामध्ये भारतीय सरकारी बॉण्ड्सचा समावेश करण्यात आल्यामुळे वरील गुंतवणुकीमध्ये वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे. फेब्रुवारी महिन्यात डेट बाजारामध्ये आतापर्यंत 18,500 कोटी रुपये विदेशी गुंतवणूकदारांकडून गुंतवले गेले आहेत. जानेवारी महिन्यामध्ये एकंदर 19 हजार 836 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती, जी गेल्या सहा वर्षातली सर्वाधिक मानली गेली होती. 2017 मध्ये विक्रमी 25 हजार 685 कोटी रुपयांची गुंतवणूक विदेशी गुंतवणूकदारांनी शेअरबाजारात केली होती.









