बेळगाव प्रतिनिधी – दीपावलीनिमित्त बेळगाव शहरातील क्रांतिवीर नाना पाटील चौक, चव्हाट गल्ली येथे दिवाळीच्या शुभेच्छा देणारा 18 फुटाचा आकाश कंदील आमदार ॲड.अनिल बेनके यांनी उभारला आहे. हा आकाश कंदील शहरवासीयांचे लक्ष वेधून घेत असून बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी समस्त शहरवासीयांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी चव्हाट गल्ली येथील आमदार कार्यालयासमोर दिवाळीच्या शुभेच्छा देणारा भव्य रंगीबेरंगी आकर्षक असा आकाश कंदील उभारला आहे. आमदार बेनके यांच्या छायाचित्रासह दिपावलीच्या शुभेच्छा देणारा हा आकाश
कंदील बनविण्यासाठी चव्हाट गल्ली येथील युवा कार्यकर्ते श्रीनाथ पवार, अंनत बामणे, उदय किल्लेकर, निखिल पाटील, तेजस ताशिलदार व यांच्या सहकाऱ्यांनी मोठ्या परिश्रमाने बेळगावातील भव्य असा 18 फूट उंचीचा आकाश कंदील तयार करण्यात आला आहे. क्रांतिवीर नाना पाटील चौकात उंचावर बसवण्यात आलेला आकाश कंदील साऱ्यांचे लक्ष वेधून घेऊन कुतूहल निर्माण करीत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









