पाऊस नसल्याने केवळ 9 फूट पाणी शिल्लक
प्रतिनिधी /बेळगाव
एरवी जून महिन्यात सुरू होणाऱया पावसाने दडी मारल्याने राकसकोप जलाशयाची पाणीपातळी कमी होत चालली आहे. गतवषी वेळेत पाऊस सुरू झाल्याने पाणीपातळी 9 फुटाने वाढली होती. मात्र यंदा पाऊस गायब झाल्याने केवळ 9 फूट पाणीसाठा शिल्लक राहिला असून केवळ 18 दिवस पुरेल इतका पाणीसाठा राकसकोप जलाशयात आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱया राकसकोप जलाशयाची पाणीपातळी मागील वषी पावसाळय़ात तुडुंब झाली होती. तसेच एप्रिल महिन्यातदेखील पाऊस सलग झाल्याने पाणीटंचाई निर्माण होणार नाही अशी अपेक्षा होती. पण जूनच्या 7 तारखेला सुरू होणाऱया पावसाने दडी मारली आहे. वेळेत पाऊस सुरू झाल्यास शहरवासियांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत नाही.
पण सध्या पावसाचा पत्ता नसल्याने राकसकोप जलाशयाची पातळी कमी होत चालली आहे. राकसकोप जलाशयात 9 फूट पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वषी 2462.01 फूट इतकी पाणीपातळी होती. मात्र यंदा 2453.06 इतका पाणीसाठा आहे. 2444 फुटापर्यंतचा पाणीसाठा वापरता येणे शक्मय आहे. त्यामुळे राकसकोप जलाशयात असलेला पाणीसाठा आणखीन 18 दिवस पाणीपुरवठा करता येवू शकतो. येत्या काही दिवसात पावसाला सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे. जर पाऊस लांबल्यास शहरात पाणीटंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्मयता आहे. सध्या 5 दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
पाणीटंचाईला सामोरे जाण्याची शक्मयता तसेच हिडकल जलाशयामधून पाणी उपसा केला जात आहे. त्याचप्रमाणे कॅन्टोन्मेंटच्या पाणीपुरवठय़ात 50 टक्के कपात करण्यात आली आहे. त्यामुळे शहरवासियांना आतापर्यंत पाणीटंचाईची समस्या भेडसावली नाही. मात्र पाऊस सुरू न झाल्यास पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्मयता आहे. राकसकोप जलाशयात 18 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा आहे. जर पाऊस न झाल्यास डेड स्टोअरेजमधील पाणी उपसा करून शहरवासियांना पुरवावा लागणार आहे. डेड स्टोअरेजमधील पाणीसाठा मुबलक मिळू शकत नाही. पण डेड स्टोअरेजमधील पाणीसाठय़ाच्या आधारे शहरवासियांची आठ दिवस तहान भागवता येणे शक्मय आहे.









