प्रतिनिधी/ बेंगळूर
धारवाड जिल्ह्यातील दासनकोप्प येथे मंगळवारी प्राप्तिकर विभागाने टाकलेल्या छाप्यात एका फ्लॅटमध्ये सुमारे 18 कोटींची रोकड आढळली आहे. सदर रक्कम जप्त करण्यात आली आहे. या कारवाईमुळे खळबळ माजली आहे. दासनकोप्प क्रॉसजवळ अर्ना रेसिडेन्सीवर बसवराज दत्तनवर यांच्या निवासस्थानावर प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी तडकाफडकी छापा टाकला. इमारतीच्या फ्लॅट क्र. 303 मध्ये स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने ही कारवाई करण्यात आली. छाप्यावेळी आढळलेले 18 कोटी रुपये कोणाचे आहेत, याविषयी तपास सुरू आहे.









