कोल्हापूर
कोल्हापूरातील वळीवडे येथील गोळा प्रकल्पातील तब्बल १८ गायींचा विषबाधेने मृत्यू झाला आहे. मागील रविवारपासून (दि. १६) आजपर्यंत (दि. २७) तब्बल १८ गायींचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकल्पात एकूण २३ जर्सी गायीं आहेत. यापैकी १८ गायींना विषबाधा झाल्याने मृत्यू झाला आहे. वाळलेल्या चाऱ्यातून गायींच्या पोटात तयार झालेल्या आम्लपित्तामुळे विषबाधा होऊन गायी दगावल्याचा प्राथमिक अंदाज दिला जाता आहे. चिंचवाड येथील शांतिनाथ पाटील, संदीप पाटील आणि ज्ञानमती पाटील यांनी कर्ज घेऊन हा मोठा प्रकल्प सुरु केला होता.
Previous Articleकलंबिस्त येथील आरोग्य शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद
Next Article ‘क्रिप्टो’ने कोल्हापूर चौकशीच्या फेऱ्यात








