ऑनलाईन टीम / तरुण भारत :
देशात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या 18 बांग्लादेशी नागरिकांना नवी मुंबईतील घणसोली परिसरातून अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये 10 महिलांचाही समावेश आहे.
लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हे सर्व बांग्लादेशी नागरिक घणसोली परिसरातील एका इमारतीत एकत्र येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुतसार गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी रात्री या इमारतीवर छापा टाकून 10 महिलांसह एकूण 18 बांग्लादेशींना अटक केली. ते मागील वर्षभरापासून कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय भारतात राहत होते. त्यांच्याविरोधात फॉरेनर्स ऍक्ट 1946 आणि पासपोर्ट (भारतात प्रवेश) नियम 1950 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरू आहे.
अधिक वाचा : राज्यातील अवैध बांधकामांवरील तिप्पट दंड माफ









