मुंबई \ ऑनलाईन टीम
देशभरासह राज्यात करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आता 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना लसीकरण सुरू होत आहे. याबाबत आज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईतील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत लसीकरण नेमकं कसं होणार यासंदर्भात माहिती दिली. लसीकरणासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज आहे, मात्र लसींचा पुरवठा देखील त्याप्रमाणात होणं आवश्यक असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
महापौर किशोरी पेडणेकर यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की,आपण जर प्रत्येक वॉर्डसाठी एक लसीकरण केंद्र देण्याचं ठरवलं तर, लसीकरणाचं प्रमाण वाढणार आहे. खासगी रूग्णालयांना देखील आपण लसीकरणासाठी परवानगी देत आहोत. त्यामुळे प्रत्येकजण आपलं मनुष्यबळ घेऊन तयार देखील राहणार, पण तेवढ्या प्रमाणात लस उपलब्ध होणार का? ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांत जशी लस उपलब्ध होत आहे, त्याप्रमाणे आपण लसीकरण करत आहोत. 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण करायचं आहे. या पार्श्वभूमीवर लसीकरणाची संपूर्ण तयारी झाली आहे, पण जर लसच तेवढ्या प्रमाणात उपलब्ध झाली नाही, तर नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागेल. आपल्याला 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण करायचं आहे. मात्र लसीकरणाचा साठा आल्यानंतर जे 45 वर्षांवरील कोमॉर्बिड लोक, तसेच जे 60 वर्षांवरील आहेत. ज्यांचा आता दुसरा डोस सुरु आहे. त्यांच्या लसीकरणाचा कार्यक्रमही आपल्याला त्याच वेळी चालवावा लागणार आहे. त्यामुळे अद्यापही राज्य सराकार आणि महानगरपालिका यांच्यात बैठका असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.
राज्य सराकार आणि महानगरपालिका यांच्यात बैठका सुरु आहेत. 1 मे पासून लसीकरण निश्चितच सुरु होणार आहे, पण ते सुरु होत असताना, कुठे होणार? कुठल्या ठिकाणी पहिल्यांदा सुरु होणार, याबाबतचं नियोजन करण्यासाठी काही जणांच्या सूचना देखील आल्या आहेत. त्यानुसार तीन टप्प्यांमध्ये लसीकरणाची विभागणी करावी लागणार आहे. सर्व वयोगट एकत्र करणं हे योग्य ठरणार नाही. कोविन अॅपमध्ये नोंदणी झाल्यानंतर आणि लस मिळत असल्याची खात्री झाल्यावरच लस घेण्यासाठी संबंधित व्यक्तीने गेलं पाहिजे.” तसेच यासंदर्भात आयुक्तस्तरावर सध्या चर्चा सुरु आहे, अंतिम टप्प्यात जेव्हा सगळ्या गाईडलाइन्स येईल त्यावेळी यांसदर्भातील माहिती सर्वांना देण्यात येईल, असंही महापौरांनी यावेळी स्पष्ट केलं.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








