मुंबई \ ऑनलाईन टीम
राज्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. पण लशीचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्यामुळे लसीकरण मोहीमेत अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळेच आता 18 ते 44 वयोगटासाठी देण्यात येणारी लस ही 45 वर्षांपुढील व्यक्तींना दिली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राजेश टोपे यांनी मुंबई पत्रकार परिषद घेऊन याविषयी माहिती दिली.
राजेश टोपे माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, 18 ते 44 वयोगटातील व्यक्तीचं लसीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्र सरकारने 45 वर्षांपुढील नागरिकांची जबाबदारी घेतली आहे. पण, राज्यात सध्या कोव्हॅक्सिनचे 35 हजार डोस उपलब्ध आहेत. आता दुसरा डोस द्यायचा आहे, त्यांची संख्या 5 लाखांच्या जवळपास आहे. त्यामुळे 18 ते 44 या वयोगटासाठी राज्य शासनाने खरेदी केलेलं जे कोव्हॅक्सिन आहे, ते आज साधारपणे पावणेतीन लाखांपर्यंत उपलब्ध आहे. त्याचबरोबर केंद्राकडून आलेले 35 हजार, असे मिळून तीन ते सव्वातीन लाख कोव्हॅक्सिनचे डोस 45 वर्षापुढील नागरिकांच्या दुसऱ्या डोससाठी वापरण्याचा निर्णय आरोग्य विभागाने मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून घेतल्याची माहिती राजेश टोपे यांनी यावेळी दिली.
18 ते 44 या वयोगटातील लस देण्याचे जाहीर केले होते. पण लसीचा साठा कमी प्रमाणात उपलब्ध आहे. ज्यांना दुसरा लसीचा डोस दिला नाही तर पहिला डोस हा वाया जाऊ शकतो. म्हणून 18 ते 44 या वयोगटातील लसीचा साठा हा 45 वरील वयोगट यासाठी वळवण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोनवर चर्चा केली आहे. त्यामुळे 18 वर्षांवरील लसीकरणाचा वेग काही दिवस स्लो डाउन करावे लागेल, टास्क फोर्स समवेत चर्चा करून कॅबिनेट चर्चा करून निर्णय करू, असंही टोपे यांनी स्पष्ट केले. म्युकोरमायकोसिसबाबत काही जिल्ह्यात हे रूग्ण आढळत आहेत. सरकारी रूग्णालयात माहत्मा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत उपचार मोफत दिले जाणार आहेत. त्यासाठी लागणाऱ्या औषधाचा खर्च राज्य सरकार उचलणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी यावेळी दिली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








