अबुधाबी
संयुक्त अरब अमिरात या देशाने लसीकरणामध्ये इतर देशांच्या तुलनेत सर्वोत्तम कामगिरी केली आहे. लसीचा पहिला डोस देण्यात हा देश सध्या पहिल्या नंबरवर आहे. बुधवारपासून जवळपास 18 महिन्याच्या प्रदीर्घ कालावधीनंतर मास्कच्या नियमात शिथिलता सरकारकडून देण्यात आली आहे. 18 महिन्याच्या कालावधीनंतर येथील नागरिकांचे तोंडावरचे मास्क उतरणार आहेत. पण तरीही प्रशासनाने या नियमात एकदमही ढीलाई दिलेली नाही. काही ठराविक ठिकाणीच मास्कची सक्ती केलेली नाही. पण मास्क हटवणे म्हणजे देशाला पुन्हा ते कोरोनापूर्वीचे दिवस चांगले आठवू लागले आहेत. व्यायाम करताना, खासगी वाहनांतून प्रवास करताना, स्विमिंग पूल आणि समुद्र किनाऱयावर, बंदीस्त खोलीत एकटे असताना, सलून आणि ब्युटी पार्लर तसेच मेडिकल सेंटरवर आता सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरले तर चालणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.









