न्हावेली / वार्ताहर
17th Anniversary of Sridev Bhootnath Temple at Nirwade
श्री देव भूतनाथ मंदिर वर्धापन दिनानिमित्त सोमवार १७ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता महापुरुष कला क्रिडा मंडळ, निरवडे माळकरवाडी आयोजित नवउद्योजकांचा सन्मान होणार आहे यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली भोसले नॅालेज सिटी अध्यक्ष अच्युत भोसले सामाजिक कार्यकर्ते ॲंड . अनिल निरवडेकर शिवसेना ठाकरे गट प्रमुख रुपेश राऊळ जिल्हा बॅंक संचालक विद्याधर परब सरपंच सुहानी गावडे आदी उपस्थित राहणार आहेत.त्यानंतर अमोल टेंबकर प्रस्तुत व दिग्दर्शित अनिकेत आसोलकर यांचा रात्री ९ वाजता भूतनाथ रंगमंचावर ओंकार कलामंच सावंतवाडी निर्मित कलाविष्कार नृत्य नाट्य हास्य , विनोदांचा कार्यक्रम होणार आहे .









