Sangli Food Poisoning News : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील उमदी येथील आश्रमशाळेतील 170 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. या विद्यार्थ्यांना आज पहाटे माडग्याळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना काल रात्रीचे जेवण झाल्यानंतर पहाटे अस्वस्थ वाटू लागले होते. उलट्या ,मळमळ आणि जुलाब सुरू झाल्याने या सर्व विद्यार्थ्यांना माडग्याळ प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू करण्यात आले आहेत.
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील उमदी येथिल समता आश्रमशाळेतील मुलांना अन्नातून 170 मुलांना विषबाधा झाली आहे. उमदी ता. जत येथिल समता आश्रमशाळेतील विषबाधेची ही घटना रविवारी रात्रीच्या जेवणातून घडली आहे. विषबाधा झालेल्या मुलांना माडग्याळ येथिल ग्रामिण रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहे, तर प्रकृती खालावलेल्या 20-25 मुलांवर मिरजच्या शासकिय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. उमदी येथिल समता आश्रमशाळेत एकूण 200 मुले वास्तव्यास आहेत.









