कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व कर्मचारी पतपेढीची वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न; संचालक मंडळाच्या अभिनंदनचा ठराव
सांगरूळ / वार्ताहर
कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व कर्मचारी पतपेढीच्या सभासदांना पधरा टक्के लांभाश व दोन टक्के प्रोत्साहनपर बक्षीस असे १७ टक्के परतावा देण्याची घोषणा कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व कर्मचारी शिक्षक पतपेढी मर्यादित कोल्हापूर संस्थेचे अध्यक्ष एम पी चौगले यांनी केली. ते पतपेढीच्या ५५व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.सभा खेळमळीत पार पडली. पतपेढी प्रगतीपथावर असल्याने सभासदांनी संचालक मंडळाच्या अभिनंदनचा ठराव केला .
यावेळी बोलतानाअध्यक्ष एम पी चौगले म्हणाले ,अहवाल सालात पतपेढीने गुणात्मक वाढ करून ठेव ४० कोटी तर कर्ज ४५ कोटी वाटप केले आहे.यामुळे पतपेढीस ७५ लाख रूपये नफा झाला आहे.सभासदानी पतपेढीच्या कारभारावर विश्वास ठेवत संस्थेच्या व्यवसाय वाढीस सहकार्य केल्याने संस्थेची प्रगतीपथावर असल्याचे सांगितले. संस्थेच्या प्रगतीसाठी आमदार प्रा जयंत आसगावकर व सुखाणू कमिटी सदस्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन होत असल्याचे चौगले यांनी सांगितले.
यावेळी संस्थेचे सभासद एस. के. पाटील यांनी दिपावली भेट बारा लिटर ऐवजी पंधरा लिटर तेल देण्याची मागणी केली. सभासदांच्या अग्राहस्तव सभासदांना दिपावली भेट पंधरा लिटर तेल देण्याची घोषणा अध्यक्ष चौगले यानी केली.
सुरुवातीस स्वागत व अहवाल वाचन व्यवस्थापक अभय व्हनवाडे यांनी केले .यानंतर झालेल्या चर्चेत पी एल पोवार मनोज शिंगे, सचिन पाटील, कोजीमाशिचे संचालक दीपक पाटील, संजय डी पाटील, सुहास पाटील शिवाजी पी पाटील यांनी सहभाग घेतला . सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना संचालक मंडळांने समाधानकारक उत्तरे दिल्याने सभा खेळीमेळीत पार पडली.
सभेस संचालक तानाजी पाटील,सुप्रिया शिंदे, प्रकाश वरेकर, एस बी पाटील, आर एस पाटील, आर.बी पाटील, एल डी पाटील, मनोहर पाटील, सदाशिव चौगले,मनिषा खोत,सुनिता पाटील,अरूण कांबळे, व्ही के शिंदे उपस्थित होते.आभार उपाध्यक्ष शिवाजी लोंढे यांनी मानले .









