मुंबई :
एलआयसी कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये 17 टक्के इतकी वाढ केली जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी जीवन विमा कंपनी म्हणून लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात एलआयसीचा उल्लेख केला जातो. सरकारने कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. कंपनीमधील कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये 17 टक्के इतकी वाढ लागू केली जाणार आहे. या वाढीचा फायदा 1 लाख 10 हजारहून अधिक एलआयसी कर्मचाऱ्यांना होणार आहे. या वेतन वाढीचा फायदा 30 हजारहून अधिक पेन्शनधारकांनाही होणार असल्याचे सांगितले जात आहे. या एकंदर नव्याने करण्यात आलेल्या वाढीमुळे 4 हजार कोटी रुपयेहून अधिक खर्च येणार असल्याचे समजते.









