नवी दिल्ली :
इपीएफओ सदस्यांच्या संख्येमध्ये जानेवारी महिन्यात 11 टक्के वाढ नोंदवलेली आहे. जानेवारी 2025 मध्ये 17.8 लाख सदस्य नव्याने ईपीएफओमध्ये सामील झाले आहेत. मागच्या वर्षी जानेवारीमध्ये पाहता 16.2 लाख सदस्य जोडले गेले होते. केंद्रीय कामगार मंत्रालयाकडून सदरची माहिती देण्यात आली आहे. 2025 हे वर्ष महिना स्तरावर पाहता वाढीचे राहिले आहे. डिसेंबर 2024 च्या तुलनेमध्ये जानेवारी 2025 मध्ये सदस्य संख्येमध्ये 11 टक्के वाढ झाली आहे. एकंदर महिन्यानुसार सदस्यसंख्या जोडणी पाहिल्यास, 1.28 दशलक्ष एप्रिलमध्ये, 1.35दशलक्ष मे महिन्यात, 1.39 दशलक्ष जूनमध्ये, 1.61 दशलक्ष जुलै महिन्यामध्ये, 1.58 दशलक्ष ऑगस्ट, 1.88 दशलक्ष सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात 1.34 दशलक्ष सदस्य जोडले गेले आहेत. तर नोव्हेंबरमध्ये 1.46 दशलक्ष सदस्य इपीएफमध्ये जोडले गेले









