वृत्तसंस्था/तेल अवीव
गाझाच्या नुसरत पॅम्पमध्ये आश्र्रयस्थान म्हणून वापरल्या जाणाऱ्या शाळेवर इस्रायलने गुरुवारी हल्ला केला. या हवाई हल्ल्यात 17 पॅलेस्टिनी ठार झाले. मृत्यू झालेल्यांमध्ये एका 11 महिन्यांच्या मुलाचाही समावेश आहे. तसेच 32 जण जखमी झाले असून त्यापैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. विस्थापित कुटुंबे राहत असलेल्या आश्रयस्थानांवर यापूर्वीही इस्रायली सैन्याने यापूर्वीही हल्ले केले आहेत. पॅलेस्टीनवर दबाव टाकण्यासाठी इस्रायलकडून वारंवार तात्पुरत्या छावण्या आणि निवारागृहांवरही अनेकदा हल्ले झाले आहेत. त्याच अनुषंगाने गुरुवारी शाळेत आश्रय घेतलेल्या लोकांना लक्ष्य बनवण्यात आले.









