ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉक डाऊन जारी करण्यात आले आहे. तरी देखील कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यास यश मिळाले नाही आहे. लॉक डाऊन चा तिसरा टप्पा 17 मे रोजी संपत आहे. आता त्यानंतर काय? आणि मोदी सरकारची काय वाटचाल आहे? असा सवाल काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज केला.
सोनिया गांधी यांनी आज कोरोना आणि लॉक डाऊनचा आढावा घेण्यासाठी काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, राहुल गांधी यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
यावेळी सोनिया गांधी यांनी 17 मे ला लॉक डाऊन चा तिसरा टप्पा समाप्त होत आहे. त्यांनतर पुढे काय असा थेट सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
यावेळी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी देखील सोनियाजी म्हणतात त्याप्रमाणे लॉक डाऊन तीन नंतर काय? असे म्हणत सरकारकडे पुढच्या परिस्थितीबाबत काय योजना आहे? लॉक डाऊन तीन नंतर चे धोरण सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना माहिती असले पाहिजे असे म्हणत सरकारवर टीका केली आहे.
राहुल गांधी म्हणाले की, कोरोनाचा सामना करताना वयस्कर, मधुमेह आणि हृदयविकार असणाऱ्यांची अधिक काळजी घेतली पाहिजे असे म्हटले आहे.









