नवी दिल्ली
दूरसंचार क्षेत्रातील आघाडीवरची कंपनी भारती एअरटेलने पहिल्या तिमाहीचा निकाल घोषित केला असून सदरच्या कालावधीत कंपनीने 1,612 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा प्राप्त केल्याची माहिती आहे. आर्थिक वर्ष 2023 च्या पहिल्या तिमाहीत कंपनीने 1607 कोटी रुपयांचा नफा कमावला होता. जूनमधील नफ्यातील कंपनीची कामगिरी तज्ञांच्या अपेक्षेला खरी उतरली नाही, असे म्हटले जाते. कंपनीच्या महसुलात 14 टक्के वाढ झाली असून तो 37,440 कोटी रुपयांचा नोंदला गेला आहे.









