बेळगाव : कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना व धारवाड विभागीय संघटना मान्यताप्राप्त बेळगाव जिल्हास्तरीय 16 वर्षाखालील मुलांची निवड चाचणी ऑटोनगर येथील केएससीए क्रिकेट स्टेडियमवर पार पडली.
केएससीए स्टेडियम बेळगाव येथे आज सकाळी 16 वर्षाखालील बेळगाव जिल्हा संघाची निवड चाचणी घेण्यात आली. संपूर्ण जिल्हय़ातून जवळपास 140 क्रिकेटपटूंनी सहभाग घेतला होता. त्यामधून तीन फेऱयांच्या चाचणीनंतर 20 संभाव्य खेळाडूंची निवड करण्यात आली.
पीयूष गोहलत, उत्कर्ष शिंदे, सिद्देश असलकर, गौरव काटणे, तनुष धुमाले, आकाश कुलकर्णी कावीश मुक्कण्णावर, हर्ष व्ही. पटेल, हर्ष एम. पटेल, समर्थ पावले, अथर्व नूली, अक्षय बगडी, सुरज देसाई, अभिषेक निकम, आदित्य पाटील, महंमद रिहान बडेभाई, सुजल काकतीकर, प्रतिक खाडे, अब्दुल्ला खान, नमन ओऊळकर यांची निवड करण्यात आली. या निवड चाचणीची प्रक्रिया बेळगाव जिल्हय़ाचे प्रमुख निवड चाचणीचे सदस्य संगम पाटील व आनंद करडी यांनी काम पाहिले. ही निवड चाचणी यशस्वी करण्यासाठी केएससीए बेळगावचे पदाधिकारी व मॅनेजर महावीर यांनी विशेष परिश्रम केले.









