मध्यरात्री पोलिसांची मोठी कारवाई
वृत्तसंस्था/ इंफाळ
गेल्या 48 तासांत मणिपूरमध्ये विविध बंदी घातलेल्या संघटनांच्या एकूण 16 सदस्यांना अटक करण्यात आली आहे. रविवारी एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली. मध्यरात्री अचानक कोम्बिंग ऑपरेशन करत ही कारवाई करण्यात आली. अटक केलेल्या दहशतवाद्यांकडून शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आल्याचेही पोलिसांनी सांगितले. या कारवाईदरम्यान काही स्थानिकांनी दगडफेक करून पोलिसांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमावाला पांगवत सुरक्षा दलांनी आपली कारवाई सुरूच ठेवली. बंदी घातलेल्या युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंटच्या (पाम्बेई) दोन कार्यकर्त्यांनाही इंफाळ पूर्व जिल्ह्यातील नोंगदाम गावाजवळील नापेटपल्ली अँड्रो रोड येथून खंडणीत सहभागी असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.









