नवी दिल्ली
गेल्या सप्टेंबर महिन्यामध्ये देशातील कोळसा उत्पादनामध्ये 16 टक्के इतकी लक्षणीय वाढ नोंदवली गेली आहे. कोळसा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबर महिन्यामध्ये 67.21 दशलक्ष मेट्रीक टन इतक्या कोळशाचे उत्पादन घेण्यात आले आहे. मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये हेच कोळसा उत्पादन 58.04 दशलक्ष मेट्रीक टन इतके होते. चालू आर्थिक वर्षामध्ये सप्टेंबरपर्यंत उत्पादन 428.25 दशलक्ष मेट्रीक टन झाले, जे मागच्या तुलनेमध्ये 12 टक्के अधिक आहे.









