ठाणे महानगरपालिका संचालित छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात गेल्या 12 तासात 16 रुग्णांचा मृत्यु झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही बातमी बाहेर आल्यावर माध्यमांनी उचलून धरल्यावर या रुग्णांच्या मृत्यूच्या कारणांची विश्लेषण केले जात आहे.
ठाणे महानगरपालिका संचालित छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रात्री आणखी 16 रुग्णांना मृत घोषित करण्यात आल्याची माहिती रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी रविवारी दिली.यावेळी हॉस्पिटलचे डीन डॉ राकेश बारोट म्हणाले, “या रूग्णालयात 16 रुग्णांना मृत घोषित करण्यात आले असून त्यापैकी बरेच नागरीक वृद्ध होते. आम्ही अजूनही प्रत्येक रुग्णाच्या तपशीलाची पडताळणी करण्याचा प्रयत्न करत आहोत,” अशी त्यांनी माहीती दिली. या घटनेवेळी उपस्थित असलेल्या नागरीकांच्या म्हणण्यानुसार, एकूण 17 रुग्णांचा मृत्यू झाला होता, त्यापैकी 13 आयसीयूमध्ये आणि चार जनरल वॉर्डमध्ये होते. यातील काही रुग्णांना तातडीने खासगी रुग्णालयात पळवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या गटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अविनाश जाधव तसेच शिवसनेना ठाकरे गटाचे नेते केदार दिघे हे आपल्या कार्यकर्त्यांसह घटनास्थळी पोहोचून त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्याच बरोबर ऱाष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यानीही ठाण्यातील आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले.








