गोकुळ शिरगाव वार्ताहर
पुणे बेंगलोर महामार्गावर गोकुळ शिरगाव हद्दीतील सुदर्शन पेट्रोल पंपा समोर असलेल्या युनिटी मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड या कार विक्री शोरूममध्ये आज अज्ञात चोरट्याने कॅशवर डल्ला मारला. ही घटना शुक्रवार (दि- 5 )रोजी रात्री घडली. अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करून कॅशियर रूमचा दरवाजा उचकटून त्यामध्ये असलेले दोन्ही ड्रॉवर फोडून त्या ड्रॉवर मधील एकूण 16 लाख 56 हजार रुपये चोरून नेल्याची नोंद गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात झाली आहे.
या घटनेचे गांभीर्य ओळखून आज सकाळी या ठिकाणी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी, स्थानिक गुन्हा शाखा अन्वेषण चे महादेव वाघमोडे, गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे अविनाश माने आदींनी तपास यंत्रणा गतिमान केली आहे. या घटनेची फिर्याद इरफान नूरमोहम्मद गवंडी यांनी दिली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









