दक्षिण कोरियात अनोखे संकट, चाइल्ड केअर सेंटर होत आहेत बंद
वृद्धांना सुविधा पुरविणाऱ्या संस्थांच्या संख्येत वाढ
दक्षिण कोरियात वृद्धांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. यामुळे तेथे देखभालीच्या सुविधांमध्ये बदल केला जात आहे. मागील काही वर्षांमध्ये तेथे चाइल्ड केअरच्या सुविधांमध्ये घट झाली आहे. तर वृद्धांसाठीच्या सुविधा वाल्या आहेत.
सरकारी आकडेवारीनुसार 2017 मध्ये 40 हजारांहून अधिक चाइल्ड केअर सेंटर होते. मागील वर्षी याचे प्रमाण 30,900 पर्यंत खालावले आहे. तर वृद्धांच्या सुविधांसाठी निर्माण करण्यात आलेल्या विविध संस्थांच्या संख्येत 2017 मधील 76,000 वरून वाढत 2022 मध्ये 89,463 पर्यंत भर पडली आहे. या संस्थांमध्ये ज्येष्ठांसाठी देखभाल कक्ष, विशेष रुग्णालय आणि वेलफेअर एजेन्सीज सामील आहेत.

या संस्था वृद्धांना सामाजिक सेवा किंवा सुरक्षा मिळवू देण्यास मदत करतात. तर बाल देखभाल सुविधांमध्ये सार्वजनिक सेवांसोबत खासगी सेवा देखील सामील आहेत. हा बदल दक्षिण कोरियात अनेक वर्षांपासून सुरू असलेली समस्या दर्शवितो, ही समस्या दूर करण्यास दक्षिण कोरियाला आतापर्यंत अपयश आले आहे.
येथे जगातील सर्वात वेगाने वाढणारी वृद्ध लोकसंख्या आहे. याचबरोबर येथे 65 वर्षांपेक्षा अधिक वयाचे 40 टक्के लोक गरीबीत जगत आहेत. त्यांचे सरासरी उत्पन्न घरगुती खर्चापेक्षा 50 टक्क्यांनी कमी आहे. वृद्ध गरीबी दर अणि त्यांच्या वाढत्या संख्येमुळे आगामी काही वर्षांमध्ये त्यांची देखभाल करणाऱ्या संस्थांच्या मागणीत वाढ होणे निश्चित आहे.
दक्षिण कोरियात सर्वात कमी जन्मदर आहे. हा जन्मदर 2015 पासून सातत्याने कमी होत आहे. शाळांमध्ये मुलांअभावी देशभरातील अनेक प्राथमिक, माध्यमिक अणि महाविद्यालये बंद होत आहेत. मागील 16 वर्षांमध्ये सरकारने लोकसंख्या वाढविण्यासाठी सुमारे 16.4 लाख कोटी रुपये खर्च पेले आहेत.









