वृत्तसंस्था / श्रीनगर
कडेकोट बंदोबस्तात रविवारी पहाटे जम्मूहून अमरनाथ यात्रेसाठी यात्रेकरूंची 15 वी तुकडी काश्मीरला रवाना झाली. 4 हजार 889 यात्रेकरू 181 वाहनांमध्ये बसून पहाटे 3 वाजता काश्मीरच्या बालटाल आणि पहलगाम बेस पॅम्पसाठी रवाना झाले. या गटासह आतापर्यंत एकूण 91,202 भाविक यात्रेसाठी निघाले आहेत. 28 जून रोजी नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी अमरनाथ यात्रेच्या पहिल्या बॅचला हिरवा झेंडा दाखवला. 29 जूनपासून सुरू झालेली 52 दिवसांची अमरनाथ यात्रा 19 ऑगस्टला संपणार आहे. गेल्यावषी साडेचार लाखांहून अधिक भाविकांनी पवित्र गुहेचे दर्शन घेतले होते.









