टिळकवाडी पोलिसांची कारवाई ः दोघा जणांना अटक
प्रतिनिधी/ बेळगाव
अनगोळ नाक्मयावर टिळकवाडी पोलिसांनी एक ट्रक अडवून 15 टन रेशनचा तांदूळ जप्त केला आहे. शनिवारी सायंकाळी अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या अधिकाऱयांच्या फिर्यादीवरुन ही कारवाई करण्यात आली असून याप्रकरणी दोघा जणांना अटक करण्यात आली आहे.
बेळगाव शहर व जिह्यात रेशन तांदळांचा काळाबाजार सुरूच आहे. गेल्या 15 दिवसांपूर्वी मुरगोड (ता. सौंदत्ती) पोलिसांनी 25 टन रेशनचे तांदूळ जप्त केले होते. हुबळीहून महाराष्ट्राला नेताना ही कारवाई करण्यात आली होती. आता टिळकवाडी पोलिसांनी अनगोळ नाक्मयावर बेकायदा तांदूळ साठा जप्त केला आहे.
नौशाद दलायत, विनोद चौगुले (दोघेही रा. बेळगाव) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा जणांची नावे आहेत. टिळकवाडीचे पोलीस उपनिरीक्षक मणिकंठ पुजारी व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे. अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या अधिकाऱयांनी दिलेल्या फिर्यादीवरुन नौशाद व विनोद यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
उपलब्ध माहितीनुसार पिरनवाडीहून हा साठा महाराष्ट्रात नेण्यात येत होता. अटक करण्यात आलेल्या दोघा जणांची कसून चौकशी करण्यात येत आहे. स्वस्त धान्य दुकानातून दारिद्रय़ रेषेखालील कार्डधारकांना वितरित केल्या जाणाऱया तांदळाचा मोठय़ा प्रमाणात काळाबाजार सुरू आहे. या कारवाईने एकच खळबळ माजली आहे.









