महिलेकडून चोरट्यांचा पाठलाग
प्रतिनिधी/कराड
आगाशिवनगर येथे सोमवारी दुपारी लेडीज कटलरीच्या दुकानातून रोकडसह पर्स लंपास करून चोरटा पसार झाला. कारमधून आलेल्या चोरट्यांनी सहारा लेडीज शॉपीमधील पंधरा हजारांची रोकडसह कागदपत्रे घरांच्या चाव्या असे साहित्य पळवले. दरम्यान, दुकान मालक महिला हिना शेख यांनी चोरट्याचा पाठलाग करत त्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्याने महिलेला हिसका देत पलायन केले.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, हिना शेख यांचे मालकीचे आगाशिवनगर येथे सहारा लेडीज शॉपी दुकान आहे. सोमवारी दुपारी हिना या काहीवेळ दुकानातून शेजारीच गेल्या होत्या. यावेळी पाळत ठेवून कारमधून आलेल्या चोरट्यांनी दुकानासमोर गाडी थांबवली. दुकानात एक संशयि शिरला. त्याने दुकानाचा ड्राव्हरमधील पर्स घेत पोबारा करण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत हिना शेख तेथे पोहचल्या. त्यांनी आरडाओरडा करत चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. चोरट्याने हिना यांना हिसका देऊन पलायन केले. रटे कारमधून ढेबेवाडी फाट्याच्या बाजूने वेगाने पसार झाले.
हा प्रकार समजताच वरिष्ठ पोलीस निरिक्षक बी. आर. पाटील यांनी नाकाबंदी करत वाहन तपासणीच्या सुचना दिल्या. मात्र चोरटे गायब झाले होते. याप्रकरणी हिना शेख यांनी कराड शहर पोलिसात तक्रार दिली आहे. रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती.