क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
बेंगळूर येथे कर्नाटक स्टेट मिनी ऑलिम्पिक क्रीडा महोत्सवात ज्युडो स्पर्धेत बेळगाव जिल्हा मुला-मुलींच्या ज्युडो संघाने 11 सुवर्ण, 2 रौप्य व 2 कांस्य पदकांसह घवघवीत यश संपादन केले.
कंठीरवा स्टेडियमच्या इनडोर ज्युडो सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत 14 वर्षाखालील मुला-मुलींच्या गटाने यश संपादन केले. मुलींमध्ये 32 किलो गटात भूमिका बेळगावी, 36 किलो गटात अमृता नाईक, 40 किलो गटात श्वेता अलकनूर, 44 किलो गटात सोनाली सी. एस., 48 किलो गटात शगुफ्ता वालेकर, 52 किलो गटात आलिया, 57 किलो गटात आफ्रीन यांनी सुवर्ण तर 57 किलोवरील गटात निशा कंग्राळकरने कांस्य पदक पटकाविले.
मुलांच्या 14 वर्षाखालील 40 किलो गटात सुरज सावंतने सुवर्ण, 45 किलो गटात प्रितमने रौप्य, 50 किलो गटात अमितकुमारने रौप्य, 55 किलो गटात रियाज किल्लेकरने सुवर्ण, 60 किलो गटात अब्दुलने कांस्य, 66 किलो गटात इर्शादने सुवर्ण, 66 किलोवरील गटात आर्यन दोंडगलने सुवर्णपदक पटकाविले.
वरील सर्व ज्युडोपटू युवजन क्रीडा खाते बेळगाव येथे सराव करीत असून, त्यांना ज्युडो प्रशिक्षिका रोहिणी पाटील व सहाय्यक प्रशिक्षिका कुतुजा मुलतानी यांचे मार्गदर्शन लाभत आहे.









