आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्याला यश
कोळंब सरपंच सिया धुरी व ग्रामस्थांची होती मागणी
मालवण : प्रतिनिधी
सिंधुरत्न योजनेमधून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीची आमदार वैभव नाईक यांनी शिफारस केलेली कोळंब गावातील दोन विकास कामे मंजूर झाली आहे. यामध्ये कोळंब खडवण नाका येथे १०० केव्ही क्षमतेचा विद्युत ट्रान्सफॉर्मर बसविणे या कामासाठी १० लाख रुपये मंजूर झाले आहेत. तर कोळंब येथे ग्रामपंचायत हद्दीत स्ट्रीट लाईट बसविणे या कामासाठी ५ लाख रु मंजूर झाले आहे. लवकर हि कामे पूर्णत्वास नेली जाणार आहेत.
कोळंब गावात कमीविद्युत दाबाची समस्या होती.त्याचबरोबर काही ठिकाणी स्ट्रीटलाईट नसल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. यासाठी कोळंब सरपंच सिया धुरी व खडवण नवीन वसाहत येथील कोळंब गावातील स्थानिक ग्रामस्थांनी आमदार वैभव नाईक यांच्याकडे या कामांसाठी पाठपुरावा केला होता. सिंधुरत्न योजेनेमध्ये या कामांची शिफारस करून आ.वैभव नाईक यांनी हि कामे मंजूर करून घेतली. त्याबद्दल कोळंब सरपंच सिया धुरी व ग्रामस्थांनी आ. वैभव नाईक यांचे आभार मानले आहेत.









