मुंबईत पंधरा दिवसांच्या कालावधीसाठी जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. ही जमावबंदी 3 डिसेंबर ते 17 डिसेंबर रोजी रात्रीपर्यंत लागू असेल.
मुंबईमध्ये पंधरा दिवसांसाठी जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे.3 डिसेंबर ते 17 डिसेंबर रोजी रात्रीपर्यंत ही जमावबंदी असणार आहे. पोलिसांना सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या कालावधील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
या पंधरा दिवसांच्या कालावधीत पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास परवानगी नाही. याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलं आहे. तसेच या कालावधीत लाऊडस्पीकर, मिरवणूक आणि मेळावे घेण्यास बंदी आहे.3 डिसेंबर ते 17 डिसेंबर पर्यंत कलम 144 अंतर्गत जमावबंदी (Prohibition) असेल मात्र संचारबंदी (No Curfew) नसेल.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









