ऑनलाईन टीम / तरुण भारत :
15 crore fraud case against former BJP corporator एका कंपनीची जमीन परवानगी न घेता परस्पर दुसऱ्याला विकल्याप्रकरणी पिंपरीतील भाजपच्या माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या माजी नगरसेवकावर तब्बल 15 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
रामकृष्ण गोविंदस्वामी पिल्ले उर्फ राजेश पिल्ले (वय 52, रा. अजमेरा हाऊसिंग कॉलनी पिंपरी, पुणे) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी संजय दयानंद ओसरमल (वय 39, रमाबाई नगर, लिंक रोड पिंपरी पुणे, मूळ. रा. अहमदनगर) यांनी फिर्याद दिली आहे.
अधिक वाचा : मान्सूनचा महाराष्ट्राला लवकरच अखेरचा सलाम
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 05/02/2019 ते मे 2022 या दरम्यान घडली. आरोपी रामकृष्ण पिल्ले हा ब्रह्माकॉर्प लिमिटेड या रामकुमार अग्रवाल यांच्या कंपनीसाठी जमीन खरेदी विक्री व्यवहारांमध्ये विश्वस्त प्रतिनिधी म्हणून काम करत होता. त्याने चर्होली बुद्रुक (ता. हवेली,पुणे) येथील सर्वे नंबर 210 हिस्सा नंबर 6 मधील एकूण 95 आर ही मिळकतअग्रवाल यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता परस्पर संतोष सोपानराव लांडगे आणि धनंजय हनमंत लांडगे यांच्या नावाने खरेदीखताने विक्री करून 15 कोटी रुपयांचा अपहार केला. पोलीस निरीक्षक रवींद्र कदम अधिक तपास करत आहेत.









