प्रतिनिधी/ बेंगळूर
महापूर आणि भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसानीला सामोरे गेलेल्या हिमाचल प्रदेशला कर्नाटकने आर्थिक मदत केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या आदेशानुसार वित्त विभागाने 15 कोटी रुपये हिमाचल प्रदेशच्या खात्यावर जमा केले आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी ट्विट केले आहे. संकटकाळात आपल्या बंधू-भगिनींच्या पाठीशी उभे राहणे महत्त्वाचे आहे. कर्नाटकातील लोक हिमाचल प्रदेशातील लोकांच्या कल्याणासाठी प्रार्थना करतील, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हटले आहेत. छत्तीसगड सरकारनेही हिमाचल प्रदेशलाही मदत दिली आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी आपत्तीग्रस्तांच्या मदत आणि पुनर्वसनासाठी 11 कोटी रुपयांची आर्थिक मदत दिली आहे. तसेच राजस्थान सरकारकडूनही हिमाचल प्रदेशला 15 कोटी रुपये आर्थिक मदत देण्यात आली आहे.









