गडहिंग्लज प्रतिनिधी
गडहिंग्लज तालुका साखर कारखान्यासाठी आज रविवारी मतदान होत आहे. या निवडणुकीत दुरंगी लढतीचे चित्र असल्याने तालुक्यात सर्वच ठिकाणी चुरशीचे वातावरण पहिल्या टप्प्यात दिसून आले. सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात झाली असून ११ पर्यंत १५.४१% मतदान झाले आहे. एकूण ३ हजार ८६८ मतदारांनी मतदान केले आहे. शहरात एम.आर.स्कूलमध्ये मतदान केंद्र असल्याने दोन्ही आघाड्याकडून मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी मोठी धावपळ सुरू असल्याचे चित्र दिसून आले. आमदार हसन मुश्रीफ विरुद्ध आमदार राजेश पाटील या राष्ट्रवादीच्या दोन आमदाराच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक होत असल्याने जिल्ह्यातील सर्वांचे लक्ष लागले आहे.