वाहतूक पोलिसांच्या संशयास्पद कारभाराचा चौकशी अहवाल मिळणार केंव्हा?
प्रतिनिधी / बेळगाव
वाहतूक दक्षिण विभाग पोलीस स्थानकातील संशयास्पद कारभाराविषयी त्याच पोलीस स्थानकात सेवा बजाविणाऱया काही पोलिसांनी वरि÷ अधिकाऱयांना निनावी पत्र लिहून माहिती दिली होती. वरि÷ अधिकाऱयांनी त्या पत्राची दखल घेत संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मात्र 15 दिवस झाले तरी अद्याप चौकशी पूर्ण झाली नाही.
पोलीस मुख्यालयात निनावी पत्र पोहोचून 15 दिवस उलटले. वाहतूक विभागाचे एसीपी शरणाप्पा यांच्याकडे या प्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी सोपविली आहे. शरणाप्पा यांनी वाहतूक दक्षिण विभाग पोलीस स्थानकाला भेट देऊन चौकशीही केली आहे. मध्यंतरी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बेळगाव दौऱयाच्या बंदोबस्तामुळे ही चौकशी रखडली होती.
11 जानेवारी रोजी तरुण भारतने ‘वाहतूक दक्षिण स्थानकाचा कारभार संशयास्पद’ या मथळय़ाखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर पोलीस दलात एकच खळबळ माजली होती. चौकशी अहवालानंतर पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन संबंधितांवर कोणती कारवाई करणार याकडे साऱयांचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र अद्याप चौकशी अहवालच वरि÷ अधिकाऱयांना दिला नसल्याची माहिती मिळाली आहे.
यासंबंधी कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांच्याशी संपर्क साधला असता वाहतूक विभागाचे एसीपी शरणाप्पा यांच्याकडे चौकशीची जबाबदारी सोपविली आहे. अद्याप चौकशी अहवाल आला नाही. चौकशी सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान वाहतूक दक्षिण विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीनिवास हंडा यांची बदली झाली आहे. गोवा व महाराष्ट्र पासिंगची वाहने अडवून पैशासाठी त्यांना नाहक त्रास दिला जातो. या विषयावर निनावी पत्रात सविस्तर माहिती देण्यात आली आहे. याबरोबरच वाहतूक दक्षिण विभाग पोलीस स्थानकाचा कारभार कशापद्धतीने चालतो, पैशाची उलाढाल कशी होते? याचा उल्लेखही पत्रात केला आहे. आता चौकशी अहवालात कोणती माहिती बाहेर पडणार याकडे लक्ष लागले आहे.