ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
15 ऑगस्ट रोजी सर्वच भारतीय 75 वा स्वतंत्र दिन साजरा करण्याच्या तयारीत आहेत. 15 ऑगस्ट रोजी दिल्लीपासून ते जम्मू-काश्मीरपर्यंत अलर्ट जारी करण्यात आला आहे. यासोबतच गुप्तचर संघटनांना देखील सतर्क राहण्यासाठी सांगण्यात आले आहे. जैश आणि लष्कर संघटनेचे दहशतवदी हल्ला करणार असल्याची शक्मयता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे सुरक्षा दलाने दिल्ली पोलीस, जीआरपी, लोकल पोलिसांना सतर्क राहण्यास सांगितले आहे.
सुरक्षा यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार, 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदसह दहशतवादी संघटना मोठय़ दहशतवादी हल्ल्यांची योजना आखत आहेत. काश्मीरपासून दिल्लीपर्यंतच्या सुरक्षा यंत्रणांना दहशतवाद्यांच्या धोक्मयामुळे गेल्या आठवडय़ात हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. गुप्तचरांच्या माहितीनुसार, शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा भरलेल्या दहशतवाद्यांना भारतीय हद्दीत पाठवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.
याबद्दल सर्व सुरक्षा दलांना विशेष चेतावणी देण्यात आली आहे. तसेच कोणतीही संशयास्पद गोष्ट आढळल्यास त्याची काळजीपूर्वक तपासणी करा आणि ते निषक्रिय करताना खबरदारी बाळगण्याची सुचना देखील देण्यात आली आहे. त्यामुळे मेटल डिटेक्टरवर तैनात असणाऱया पोलिसांनीही विशेष काळजी घ्यावी आणि योग्य ती तपासणी करावी. असे देखील सांगण्यात आले आहे.