वृत्तसंस्था / नवी दिल्ली:
खासगी क्षेत्रात कार्यरत असणाऱया ऍक्सिस बँकेला 15,000 कोटी रुपयांचा निधी जमा करण्यास संचालक मंडळाने मान्यता दिली आहे, अशी माहिती बँकेने गुरुवारी शेअरबाजाराला दिली. बँकेच्या संचालक मंडळाकडे सदर निधी जमा करण्यासंदर्भात संबंधीत प्रस्ताव सादर करण्यात आला
होता.
सदरचा निधी हा इक्विटी समभागांतून, डिपॉझिट रिसीट्स व अन्य साधनाच्या आधारे जमा करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. बँकेनी दिलेल्या माहितीनुसार योग्य संस्थात्मक नियोजन(क्मयूआयपी), अमेरिकन जमा प्राप्ती (एडीआर) किंवा जागतिक जमा प्राप्तीच्या (जीडीआर) तसेच अन्य अनुमतीच्या प्राप्त साधनाची मदत घेतली जाण्याची शक्मयता आहे. यासाठी संचालक मंडळाने उच्च पातळीवरुन मान्यता दर्शवली आहे. निधी जमा करण्याच्या प्रस्तावाला बँकेच्या आगामी वार्षिक बैठकीमध्ये समभागधारकांची मंजुरी घेतली जाणार असल्याचे म्हटले आहे.









