म्हापसा : अडवलपाल येथील श्री देवी शर्वाणी, महादेव, गणपती, बाळवंस, पेटेकर कुलपुरूष, बाप ब्राम्हण वगैरे देवतांचा वर्धापनदिन 14 ते 17 एप्रिल याकालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे. राजेश प्रभाकर साळगावकर यांना शतचंडी महोत्सवाचे यजमानपद लाभले आहे. यानिमित्त मंदिरात शुक्रवार दि. 14 रोजी सकाळी साळगाव येथील शर्वाणी देवीच्या मुळस्थानी यजमान गुरूदास साळगावकर यांच्या हस्ते लघुरूद्राभिषेक, आरती व तीर्थप्रसाद होईल. सायंकाळी 5 वाजता अडवलपाल येथे प्रायश्चित विधी, देतवा प्रार्थना, संकल्प गणपती पूजन, स्वती पुण्याहवाचन, मातृकापूजन, देवनांदी श्राध्द होईल. शनिवार दि. 15 रोजी सकाळी 8.30 वाजता प्राकारशुध्दी, शतचंडी जप, गण्sश याग, मुळपुरूष ब्राम्हण, पानेकरी रवळनाथ लघुरूद्राभिषेक, हनुमान लघुरूद्र, कुंकूमार्चन, सायंकाळी 5 वाजता सत्यमारूती पूजा होणार आहे. सत्यमारूती पूजेसाठी इच्छुकांनी कार्यकारीणीशी संपर्क साधवा. रविवार दि. 16 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता स्थळशुध्दी, शतचंडी जप, वेताळ महारूद्र, लघुरूद्रजप, हवन भूतनाथ लघुरूद्रजप हवन, अन्नपूर्ण देवी सुक्त, नितकरी लघुरूद्र, श्री देव रवळनाथ लघुरूद्र, सातेरी देवी सुक्त, श्री वेताळ, आकारी पुरूष लघुरूद्र, पूर्वस, भूमीपुरूष निर्वशी जप हवन, कुंकूमार्चन, उत्सवमूर्तीवर देवीसुक्त आवृत्ती रात्री 9 वा. आजगावकर दशवतारी मंडळाचे दशावतारी नाटक होईल. सोमवार दि. 17 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता प्राकारशुध्दी, दत्तयाग, सत्पुरूष लघुरूद्र, महादेव लघुरूद्र, जप हवन, दामोदर जपहवन, देवी स्मारक देवीसुक्त आवृत्ती, बाळवंस, बाप, ब्रम्हण, सुवासिनी जप हवन, पुरमार महापूजा, कुमारी पूजा, बलिदान, कुष्मांड बलिदान, पूर्णाहूती, श्रेयोग्रहण, आर्शीवचन, महानैवेद्य, महाआरती, महागाऱ्हाणे व महाप्रसाद होईल. संध्याकाळी पेटकर कुलपुरूषकडे कौल व रात्री देवीची रथप्रदक्षिणा होईल. सर्व महाजन, भाविकांनी सहपरिवार उपस्थित राहून श्रीकृपेचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान समितीने केले आहे.
Previous Articleबेकायदेशीर, विनामूल्यांकन घरांना कर जाळ्यात कधी आणणार ?
Next Article सांखळीत लोकांनी अनुभवला वीरभद्राचा थरार
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









