एका दिवसात उच्चांकी 545 रुग्णांना डिस्चार्ज : सक्रिय रुग्णसंख्या 12 हजारावर
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिल्हय़ात कोरोनाने मृत्यू होणाऱया रुग्णांची संख्या वाढतच असून मृत्यूचे तांडव सुरू झाले आहे. बुधवारी आणखी 15 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 146 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांची संख्या 12 हजारावर गेली आहे. मात्र दिलासा देणारी बाब म्हणजे बरे झालेल्या 545 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एका दिवसात एवढे रुग्ण कोरोनामुक्त होणे ही आजपर्यंतही एका दिवसातील उच्चांकी संख्या आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.
दरम्यान जिल्हय़ात शासकीय व खासगी कोविड सेंटरमध्ये 1320 बेड उपलब्ध असून त्यापैकी 773 बेडवर रुग्ण आहेत, तर 547 बेड शिल्लक आहेत, अशी माहिती देण्यात आली. कोरोनाने बुधवारी 15 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये जिल्हा रुग्णालयात 11 जणांचा मृत्यू, एसएसपीएम पडवे हॉस्पिटलमध्ये दोन रुग्णांचा मृत्यू, जामसंडे येथील कोविड सेंटरमध्ये एकाचा मृत्यू आणि सावंतवाडी उपजिल्हा रुग्णायात एकाचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 60 वर्षांच्या आतील आठजणांचा, तर 60 वर्षांवरील सातजणांचा मृत्यू झाला आहे.
बुधवारी नव्याने 147 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 12 हजार 27 झाली आहे, तर एकाच दिवशी 545 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आजपर्यंत एकूण 9 हजार 332 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्हय़ात 2 हजार 382 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
पॉझिटिव्ह रुग्णापैकी 201 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून त्यातील 170 रुग्ण ऑक्सिजनवर, तर 31 रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.
जिल्हय़ातील सद्यस्थिती : बुधवारचे नवीन पॉझिटिव्ह रुग्ण एकूण 146, एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 12,027. सद्यस्थितीतील एकूण सक्रिय रुग्ण 2,382, सद्यस्थितीत उपचारासाठी जिल्हय़ाबाहेर गेलेले रुग्ण सहा, बुधवारी बरे झालेले रुग्ण 545, तर आतापर्यंत 9,332, मृत झालेले बुधवारी 15, तर आतापर्यंत 307.
कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 43 रुग्ण
तालुकानिहाय बुधवारचे पॉझिटिव्ह रुग्ण : देवगड – 10, दोडामार्ग – पाच, कणकवली – 23, कुडाळ – 43, मालवण – 33, सावंतवाडी – 12, वैभववाडी – पाच, वेंगुर्ले – 10, जिल्हाबाहेरील – एक.
तालुकानिहाय आजपर्यंत मिळालेले पॉझिटिव्ह रुग्ण : देवगड – 1166, दोडामार्ग – 624, कणकवली – 3,130, कुडाळ – 2409, मालवण – 1319, सावंतवाडी – 1559, वैभववाडी – 788, वेंगुर्ले – 940, जिल्हय़ाबाहेरील रुग्ण – 92.
तालुकानिहाय सक्रिय रुग्ण : देवगड – 281, दोडामार्ग – 113, कणकवली – 464, कुडाळ – 337, मालवण – 379, सावंतवाडी – 298, वैभववाडी – 298, वेंगुर्ला – 164, जिल्हय़ाबाहेरील – 48.
तालुकानिहाय आजपर्यंतचे एकूण मृत्यू : देवगड – 30, दोडामार्ग – नऊ, कणकवली – 72, कुडाळ – 46, मालवण – 40, सावंतवाडी – 56, वैभववाडी – 32, वेंगुर्ला – 21, जिल्हय़ाबाहेरील रुग्ण – एक.
आरटीपीसीआर आणि ट्रुनॅटटेस्ट टेस्ट रिपोर्टस् : तपासलेले नमुने बुधवारी 484, एकूण 61 हजार 620 पॉझिटिव्ह आलेले नमुने 8,256.
ऍन्टिजन टेस्ट तपासलेले नमुने : बुधवारी 210, एकूण 35 हजार 223. पैकी पॉझिटिव्ह 3,774.
जिल्हय़ात आणखी 15 जणांचा मृत्यू
बुधवारी जिल्हय़ात आणखी 15 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये कणकवली तालुक्यातील हळवल येथील 75 वर्षीय पुरुष, मधलीवाडी येथील 79 वर्षीय महिला, कणकवली येथील 54 वर्षीय पुरुष, चिंचवली येथील 62 वर्षीय पुरुष, तर तेलीअळी येथील 43 वर्षीय महिला, मालवण तालुक्यातील आंबेरी येथील 30 वर्षीय पुरुष, काळसे येथील 51 वर्षीय पुरुष, दोडामार्ग-कळणे येथील 35 वर्षीय महिला, कुडाळ-पाट येथील 85 वर्षीय पुरुष, तर पिंगुळी येथील 78 वर्षीय महिला, देवगड-तळेबाजार येथील 50 वर्षीय महिला, सावंतवाडी-जुनाबाजार येथील 81 वर्षीय व ओटवणे येथील 50 वर्षीय दोन पुरुष, वैभववाडी-नावळे येथील 50 वर्षीय पुरुष, वेंगुर्ले-पाट येथील 72 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.









