मुंबई :
गेल्या दोन ते अडीच महिन्यांमध्ये विदेशी पोर्टफोलियो गुंतवणूकदारांनी शेअरबाजारात पैसे काढण्यावर भर दिला होता. परंतु नोव्हेंबर महिन्यामध्ये मात्र विदेशी गुंतवणूकदारांनी 1433 कोटी रुपयांची गुंतवणूक शेअर बाजारात समभागांमध्ये केली असल्याचे दिसून आले आहे. 15 नोव्हेंबरपर्यंत विदेशी गुंतवणूकदार हे निव्वळ विक्रेते या भूमिकेमध्ये होते. परंतु त्यानंतर मात्र 16 व 17 नोव्हेंबरला विदेशी गुंतवणूकदारांनी शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य दिले. यायोगे त्यांनी 1433 कोटी रुपयांची गुंतवणूक समभागांच्या खरेदीकरता केली आहे.









