यमगर्णी हद्दीत कारवाई : ट्रकचालक ताब्यात, गुन्हा दाखल
निपाणी : अन्नभाग्य योजनेंतर्गत गोरगरीब जनतेला मोफत तांदूळ कर्नाटक सरकारतर्फे दिला जात आहे. मात्र या तांदळाची काळ्या बाजारात राजरोसपणे विक्री आजही थांबलेली नाही. गुऊवारी रात्री बेळगावहून कोल्हापूरच्या दिशेने विक्रीसाठी जाणारा अन्नभाग्यचा 14 टन तांदूळ पोलिसांनी जप्त केला. येथील राष्ट्रीय महामार्गावर यमगर्णी हद्दीत ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी ट्रकचालक वजीर नजीर मुजावर (रा. संकेश्वर) याला ताब्यात घेण्यात आले. य् ााबाबत अधिक माहिती अशी, वजीर हा संकेश्वर व परिसरातून अन्नभाग्य योजनेच्या मोफत तांदळाची खरेदी करून हा तांदूळ महाराष्ट्रात विक्रीसाठी ट्रकने नेत होता. राष्ट्रीय महामार्गावरील यमगर्णी हद्दीतील तपासणी नाक्मयानजीक बसवेश्वर चौक पोलिसांनी ट्रक थांबवून तपासणी केली. यावेळी ट्रकमध्ये सुमारे 14 टन तांदूळ असल्याचे दिसून आले. याबाबत चालक वजीर याला विचारणा केली असता समर्पक उत्तरे मिळाली नाहीत. यानंतर निपाणी तहसीलदार कार्यालयाचे अन्न निरीक्षक अभिजीत गायकवाड यांना सदर माहिती देण्यात आली. त्यामुळे त्यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी ट्रकचालक वजीर मुजावर याला ताब्यात घेतले. सदर तांदळाची किंमत 3 लाख 8 हजार इतकी होते. बसवेश्वर चौक पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक आनंद पॅरीकट्टी यांच्या नेतृत्वाखाली सदर कारवाई करण्यात आली.